राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्षद्वीप प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. या पत्रावरून भाजपने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. बार मालकांसंदर्भात लिहिलेल्या पत्राचा हवाला भाजपाने दिला असून, ‘शेतकऱ्यांची आणि पशुधनाची चिंता व्यक्त करणारे पत्र ते कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहितील?’, असा सवाल भाजप मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी विचारला आहे.
लक्षद्वीप येथील नवीन प्रशासक प्रफुल पटेल यांच्या निर्णयांमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्याची मागणी करणारे पत्र लिहिलं होतं. या पत्रावरून महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी ट्विट करून पवारांवर टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना शरद पवार कधी पत्र लिहिणार असा सवालही केला आहे.
पहिले पत्र बार मालकांसाठी तर दुसरे पत्र लक्षद्वीपमध्ये गोवंश हत्या बंदी करू नका म्हणून लॅाकडाऊन मध्ये नुकसान झाले म्हणून बारमालकांना मदत केली पाहिजे असे पत्र लिहिणारे @PawarSpeaks आता थेट
लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितात ..2 — Keshav Upadhye (@keshavupadhye) May 27, 2021
‘पहिले पत्र बार मालकांसाठी तर दुसरे पत्र लक्षद्वीपमध्ये गोवंश हत्या बंदी करू नका म्हणून…टाळेबंदीमध्ये नुकसान झाले म्हणून बारमालकांना मदत केली पाहिजे असे पत्र लिहिणारे शरद पवार आता थेट लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये, यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितात. महाराष्ट्रात कोकणात वादळ आणि अन्य भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले, पण शेतकऱ्यांची आणि पशुधनाची चिंता व्यक्त करणारे पत्र ते कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहितील? मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र कधी लिहीणार? १२ बलुतेदारांना मदत मिळाली नाही, त्याची विचारणा करणारे पत्र राज्य सरकारला पवार साहेब कधी लिहीणार?’, असे सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत.
मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र कधी लिहीणार?
१२ बलुतेदारांना मदत मिळाली नाही त्याची विचारणा करणारे पत्र राज्यसरकारला पवार साहेब कधी लिहीणार? — Keshav Upadhye (@keshavupadhye) May 27, 2021
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.