वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील चौकोर भागात असलेल्या सासमुसा साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.
या स्फोटात 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, 6 ते 8 कामगार जखमी झाले आहेत. काहीजण आत अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.