विनामोबदला शासनाकडून जमिनी संपादन केल्यामुळे भामा-आसखेड पुनर्वसनबाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत. भामा-आसखेड पुनर्वसनबाधित शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले आहे.
भामा-आसखेड धरणाच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून विनामोबदला जमिन संपादन करण्यात आल्या. त्यामुळे आळंदी मरकळ परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी जलसामाधी आंदोलन केले. आळंदीच्या पवित्र इंद्रायणी घाटावर घोषणाबाजी करत हातात तिरंगा झेंडा घेत शेतकरी जलसमाधीच्या पवित्र्यात आहेत.
माऊलींच्या इंद्रायणीत जलसमाधी घेणारच असे म्हणत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. महिलांसह शेतकरी तरुणवर्ग जलसमाधी इंद्रायणी नदी पात्रात उतरला आहे. त्यामुळे इंद्रायणी घाटावर आळंदी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आळंदी मरकळ परिसरातील जमिनीवर पुनर्वसन संपादित केलेल्या जमिनीवरील शिक्के काढण्यासाठी इंद्रायणी नदीत जलसमाधी आंदोलन सुरू केले. मात्र यादरम्यान एका वयोवृद्ध शेतकऱ्याने पाण्यात डुबकी मारत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक नागरिकांच्या प्रसंगवधनामुळे वयोवृद्ध शेतकऱ्याचा जीव वाचला. मात्र आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या वयोवृद्ध नागरिकाने उपचारासाठी जाण्यास नकार दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.