जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
बेळगावात ५०० आणि २००० च्या बनावट नोटांचा साठा मध्यरात्री बेळगाव पोलिसांनी जप्त केला आहे. जवळपास 5 कोटींच्या या बनावट नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसतात. सदाशिवनगर मधील पी डब्ल्यू डी कॉटर्स मधील एका घरात हा साठा सापडला आहे. निवडणुकीत वाटण्यासाठी या नोटा आणल्यात असा संशय आता बळावला आहे. पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मोठ्या बंदोबस्तात पहाटे पर्यंत मोजदाद सुरू होती.याचवेळी दुसरे पथक पाठवून निडोनी यास अटक करण्यात आली. घरात एका तिजोरीत या बनावट नोटांचा साठा करण्यात आल्याचे दिसून आले .
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही दाखल होऊन रात्री उशीरा पर्यंत पंचनामा केला. आता या नोटा कुठे छापल्या आणि कुणासाठी वाटणार होते याचा शोध सुरू आहे.
निडोनी हा यापूर्वी बनावट नोटा छापल्या प्रकरणी अटक झाला होता. या प्रकरणातील तो जुना गुन्हेगार आहे, त्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.