जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सायन पनवेल महामार्गावर एका बारमध्ये घुसून बारमालकाला मारहाण करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडलीय. बार मालक शेट्टी बारमध्ये असतांनाच ही मारहाण झाली आहे.
या मारहाणीत बारमालक शेट्टीला गंभीर दुखापत झालीय. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जवळच्या एका गावातील सरपंचाने ही मारहाण केल्याची चर्चा आहे. मात्र, त्याच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.