राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी मुंबई विद्यापीठाला ठोकलं टाळं

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी मुंबई विद्यापीठाला ठोकलं टाळं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत न लागल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विद्यापीठाच्या गेटला कुलूप ठोकले. 

 

निकालांची दुसरी डेडलाईनही उलटून गेल्यामुळे आव्हाडांनी हे प्रतिकात्मक पाऊल उचलले. 

 

ठरलेल्या वेळेत निकाल न लागल्यास टाळं ठोकू, अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी आधीच मांडली होती. त्याप्रमाणे सोमवारी रात्री आव्हाडांनी टाळं ठोकले.

 

युनिव्हर्सिटीच्या कलिना गेटला आव्हाडांनी कुलूप ठोकून प्रतिकात्मक आंदोलन केले.

 

त्याचप्रमाणे उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकरांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version