‘आदिपुरुष’च्या वादग्रस्त संवादावर लेखकाचे स्पष्टीकरण

‘आदिपुरुष’च्या वादग्रस्त संवादावर लेखकाचे स्पष्टीकरण

मुंबई, १७ जून २०२३, प्रतिनिधी : बहुप्रतीक्षित आदिपुरुष हा चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. परंतु पहिल्याच दिवशी या चित्रपटाला टिकांना सामोरे जावे लागले. काही ठिकानजी या चित्रपटामुळे वाद देखील निर्माण झाले. दरम्यान या चित्रपटाची हनुमानाचा एक संवाद सध्या चर्चेचा विषय बनलाय. हा संवाद सर्वाधिक टीकेचा बळी ठरला आहे. ‘कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का..तो जलेगी भी तेरे बाप की’ या संवादावर टीका होत असताना संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

आदिपुरुषचे लेखक मनोज मुंतशीर यांनी एका मुलाखतीत हनुमानाच्या तोंडी असणाऱ्या वादग्रस्त संवादावर भाष्य केले . यावेळी ते म्हणाले की, “फक्त हनुमानाबद्दल का बोललं जात आहे. जर चर्चाच करायची असेल तर प्रभू श्रीराम यांच्या तोंडी असणाऱ्या संवादावरही बोललं पाहिजे. तसंच सीतामाता जेव्हा अशोक वाटिकेत बसून रावणाला आव्हान देत सांगते की, तुझ्या लंकेत इतकं सोनं नाही की जानकीचं प्रेम खरेदी करु शकतं, त्याच्यावर चर्चा का होत नाही?.

पुढे त्यांनी या संवादामागचे कारण सांगितले. त्यांनी यावेळी आपण लिहिलेल्या संवादात कोणतीही चूक नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हनुमानाच्या तोंडी असणारे संवाद एका प्रक्रियेतून गेले आहेत.तर “एकाच चित्रपटात इतके पात्र असल्यामुळे प्रत्येकजण एकाच भाषेत बोलू शकत नाही. अशा स्थितीत काहीतरी वेगळं असण्याची गरज आहे,” असं देखील ते म्हणाले.

मनोज मुंतशीर यांनी सांगितलं की, “आमच्याकडे कथा वाचनाची परंपरा आहे. आमच्या घरात लहानपणापासून या कथा सांगितल्या जातात. हा संवाद (कपडा तेरे बाप का…) जो मी लिहिला आहे तो या देशातील अनेक महान संत, महान कथाकार असंच लिहितात, असे संवाद लिहिणारा मी पहिला नाही. होय, हे आधीपासून आहे”.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version