पदवीधर बेरोजगारांनंतर उच्चशिक्षितांचा मोर्चा

पदवीधर बेरोजगारांनंतर उच्चशिक्षितांचा मोर्चा

जय महाराष्ट्र न्युज, औरंगाबाद

पीएचडी पदवी आणि नेटसेट परीक्षा उत्तीर्ण होऊन बेरोजगार असलेल्या भावी प्राध्यापकांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मोर्चा काढला. पदवीधर बेरोजगारांपाठोपाठ आता उच्चशिक्षण घेणारे भावी प्राध्यापकही रस्त्यावर उरलेत. विद्यापीठ गेट ते विद्यापीठाच्या मुख्य इमारत यादरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. २५ मे २०१७ पासून शासनाने वेतन नियंत्रण ठेवण्यासाठी प्राध्यापकांची भरती बंद केली आहे. महाराष्ट्रात आजघडीला जवळपास १० हजार सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.

मात्र, प्राध्यापकांची भरती बंद करून उच्च शिक्षितांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. राज्यातील प्राध्यापकांच्या भरतीवरील बंदी उठवून भरती सुरू करावी, शासनाने ५० टक्के भरती ऐवजी १०० टक्के भरती करावी, या सोबत अन्य मागण्या घेऊन आंदोलकांनी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मराठवाड्यातील पीएचडी पदवी घेणारे, सेट नेट उत्तीर्ण होणारे सहभागी झाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version