शहर कचऱ्याच्या कोंडीत, लोकप्रतिनिधी सहकुटुंब निघाले पर्यटनाला

शहर कचऱ्याच्या कोंडीत, लोकप्रतिनिधी सहकुटुंब निघाले पर्यटनाला

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबाद-शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे सांगत शहरातील लोकप्रतिनिधी पर्यटनासाठी रवाना झालेत. महापौर नंदकुमार घोडेले, शहरातील तीन आमदार, शिवसेना गटनेता आणि चार नगरसेवक आणि खासदार विशेष विमानाने पर्यटनासाठी रवाना झालेत. विशेष म्हणजे या पर्यटनासाठी पक्षभेद आणि राजकीय वैर विसरून ही सारी मंडळी गळ्यात गळा घालून अत्यंत उत्साहाने निघालेत.

गेल्या सव्वा महिन्यापासून हे शहर कचऱ्याच्या अभूतपूर्व कोंडीत सापडले आहे. महापालिका हा प्रश्न सोडवण्यात पुरती अयशस्वी झाली असून जाळलेल्या कचऱ्याचा धूर आणि दुर्गंधी यामुळे शहर अनारोग्याच्या समस्येला तोंड देते आहे. अजूनही शहरात जागोजागी कचऱ्याचे डोंगर साचलेले आहेत. त्यांची विल्हेवाट कुठे आणि कशी लावायची, असा प्रश्न समोर आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version