कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

कल्याण, ३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: कल्याणमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेत भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी विशाल हा सराईत गुन्हेगार आहे. याआधी देखील आरोपीविरोधात बलात्कार, विनंयभंगाचे पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आरोपीवर चोरी आणि लुटीचे देखील गुन्हे दाखल आहेत. विशालला याआधी तडीपार देखील करण्यात आले होते.

धक्कादायक बाब म्हणजे विशालने या मुलीचा स्कुटीने पाठलाग केला. एका कोपऱ्यात तिला खेचत नेले तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थीने तिची सुटका करत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. विशाल गवळी याच्या विरोधात याआधी देखील बलात्कार आणि पोकसो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. विशाल गवळीला या आधी तडीपार देखील करण्यात आले होते.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version