वृत्तसंस्था, टेक्सास
अमेरिकेतील टेक्सास चर्चमध्ये एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन वर्षाच्या लहान मुलाचाही समावेश आहे. हल्ल्यात 20 जण जखमी असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोरही ठार झाला असून त्याला पोलिसांनी मारले की त्याने स्वत:च गोळी झाडून घेतली याबाबत नेमकी माहिती हाती आलेली नाहीये.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ट्रम्प सध्या जपान दौऱ्यावर असून तिथूनच ते संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.