वयाच्या ८३ व्या वर्षी ‘हा’ अभिनेता झाला बाप

वयाच्या ८३ व्या वर्षी ‘हा’ अभिनेता झाला बाप

मुंबई, १६ जून २०२३, प्रतिनिधी : हॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अल्फ्रेडो जेम्स पचिनो उर्फ अल पचिनो गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अल पचिनोची प्रियसी गरोदर असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आले होते. दरम्यान आता आणखी एक बातमी समोर आली आहे.

हॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अल्फ्रेडो जेम्स पचिनोने वयाच्या 83 व्या वर्षी आपल्या चौथ्या मुलाचं स्वागत केलं आहे. अच पचिनोची प्रियसी नूर अल्फल्लाहने वयाच्या 29 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे. तर आता अल आणि नूरने त्यांच्या लाडक्या लेकाचं नाव रोमन पचीनो ठेवलं आहे. त्यामुळे सध्या अल पचिनो यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अल पचिनो आणि नूर अल्फल्लाहन 2022 पासून एकमेकांच्या प्रेमात आहेत.

याआधी अल पचिनो जॉन टेरंटला डेट करत होता. त्यावेळी त्यांना ज्युली नावाची मुलगी झाली. ज्युली आता 33 वर्षांची आहे. त्यानंतर 1997 ते 2003 यादरम्याळ अल पचिनोने डेव्हरली डी एंजेलोला डेट केलं. बेव्हरली डी’एंजेलो आणि अल पचीनो यांना अँटोन आणि ऑलिव्हिया ही जुळी मुलं आहेत. ही मुलं आता 22 वर्षांची आहे. दरम्यान अल पचिनो यांनी आता चौथ्या मुलाचं स्वागत केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version