धुळे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्मशानामध्ये काही दिवसांपासून ठीक ठिकाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता एक अत्यंत संवेदनशील आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धुळ्यातील स्मशान परिसरातून दशक्रिया अटपल्याच्यानंतर उरलेली राख चोरण्याच प्रकरण समोर आल असून या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दशक्रिया विधी पूर्ण झाल्यानंतर उरलेली राख अज्ञात व्यक्तीकडून चोरली जात असल्याचं समोर आलं असून यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मंगला देसले यांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिमसंस्कार धुळ्यातील एका स्मशानभूमित करण्यात आले. मात्र त्यांच्यावरील दशक्रिया अटपल्याच्यानंतर त्यांची राख कोणी तरी चोरून नेली असल्याचे कुटुंबीयांना समजलं. त्यानंतर मंगला देसले यांच्या कुटुंबाकडून त्यांची राख चोरली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी करत संताप व्यक्त केला जात आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सुरक्षा वाढवावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.