पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या तरुणाचे नाव अमन आवटी असे आहे. या तरुणाला बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर मधून अटक करण्यात आली आहे.
हा तरुण या मंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करुन टीक-टॉक एपवर अपलोड करायचा.
या तरुणाच्या विरोधात हिंदूत्ववादी संघटनांनी पोलिसांमध्ये तक्रार केली गेली. या तक्रारीनंतर संकेश्वर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
या तरुणाची हिंडलगा कारागृहात रवाना करण्यात आलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.