‘धडक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अर्जून कपूरने मागितली जान्हवीची माफी…

‘धडक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अर्जून कपूरने मागितली जान्हवीची माफी…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मराठी चित्रपट ‘सैराट’चा रिमेक असलेला ‘धडक’ या चित्रपटाचे ट्रेलर आज रिलीज झाले आहे. या ट्रेलर रिलीजचा उत्साह संपूर्ण बॉलिवूडमध्ये पहायला मिळत आहे, कारण दिवगंत श्रीदेवींची मुलगी जान्हवी या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे. श्रीदेवी यांच्या अचानक झालेल्या निधनाने जान्हवी कपूरला मोठा धक्का बसला मात्र तरीही तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर तिचा सावत्र भाऊ अर्जून कपुर हा जान्हवीची खुप काळजी घेतो. अर्जून कपूर जान्हवीला नेहमी सपोर्ट करताना दिसतो. सध्या अर्जून आपला आगामी चित्रपट ‘नमस्ते इंग्लंड’च्या शूटींगकरिता लंडनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे अर्जून जान्हवीच्या धडक चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला उपस्थित राहू शकला नाही. याबद्दल अर्जूनने एका ट्वीटद्वारे जान्हवीकडे माफी मागितली आहे.

अर्जूनने आपल्या ट्वीटमध्ये लिहीले आहे की, उद्यापासून तु प्रेक्षकांच्या जीवनाचा एक भाग बनणार आहेस कारण तुझ्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मी तुझी माफी मागतो की मी तुझ्यासोबत तिथे नाही पण मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. तु काहीही काळजी करु नकोस. या ट्वीटद्वारे त्याने आपल्या बहिणीवरील प्रेम व्यक्त करत तिला सपोर्टही केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version