ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जास्त अशक्तपणामुळे त्यांना अहमदनगरच्या नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अण्णा हजारे सलग सात दिवस विविध मागण्यांसाठी उपोषण केले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालवली होती. तसेच उपोषणामुळे त्यांचे वजनही घटले होते.

अशक्तपणामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने ते रुग्णालयात उपचार आणि तपासणीसाठी दाखल झाले आहे. तसेच त्यांच्यावर दोन दिवस उपचार सुरू असणार आहे. उपचार झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. उपोषणामुळे जास्त अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी, तसेच विविध मागण्यापूर्ण होण्यासाठी अण्णा हजारे सरकारविरोधात सात दिवस उपोषणाला बसले होते. त्यांच्या मागण्यापूर्ण मान्य झाल्यामुळे त्यांनी उपोषण सोडले. मात्र त्यामुळे आता त्यांची प्रकृती खालावली असल्याचे समोर आले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version