बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह शिवसैनिकांवर पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. आता अनिल परब यांच्यासह इतर सहा जणांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांच्यासमोर ३० जून रोजी सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे अनिल परब यांना दिलासा मिळणार की त्यांचा अर्ज फेटाळून लावणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.