Global Humanitarian Award: वन्यजीव संवर्धनात अनंत अंबानींचा जागतिक डंका; ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन’ पुरस्कार मिळवणारे ठरले आशियातील पाहिले व्यक्ती

अमेरिकेतील सर्वात जुनी आणि मोठी प्राणी कल्याण संस्था असलेल्या 'अमेरिकन ह्युमॅन सोसायटी'च्या वतीने वॉशिंग्टन येथे हा सोहळा पार पडला.<br/>
Global Humanitarian Award: वन्यजीव संवर्धनात अनंत अंबानींचा जागतिक डंका; ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन’ पुरस्कार मिळवणारे ठरले आशियातील पाहिले व्यक्ती

Global Humanitarian Award:  रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांनी वन्यजीव संवर्धन आणि प्राणी कल्याणाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांच्या 'वंतारा' (Vantara) या उपक्रमाद्वारे प्राण्यांच्या सेवेसाठी केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित 'ग्लोबल ह्युमॅनिटेरियन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारे अनंत अंबानी हे जगातील सर्वात तरुण व्यक्ती आणि पहिले आशियाई ठरले आहेत. अमेरिकेतील सर्वात जुनी आणि मोठी प्राणी कल्याण संस्था असलेल्या 'अमेरिकन ह्युमॅन सोसायटी'च्या वतीने वॉशिंग्टन येथे हा सोहळा पार पडला.

जागतिक दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार हा जागतिक स्तरावर प्राण्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या मोजक्याच व्यक्तींना दिला जातो. या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्यांच्या यादीत आता अनंत अंबानी हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी, बिल क्लिंटन आणि बेट्टी व्हाइट यांसारख्या दिग्गज व्यक्तींच्या गटात सामील झाले आहेत. वंतारा या जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन कार्यक्रमाच्या स्थापनेत त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

'सर्व भूत हित' हीच वंताराची प्रेरणा

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना अनंत अंबानी यांनी आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, "हा सन्मान म्हणजे 'सर्व भूत हित' म्हणजेच सर्व प्राण्यांचे कल्याण या शाश्वत भावनेला मिळालेली पावती आहे. प्राणी आपल्याला संतुलन आणि नम्रता शिकवतात. संवर्धन हे केवळ भविष्यासाठी नाही, तर तो आजचा एक सामायिक धर्म आहे. वंताराचे ध्येय प्रत्येक जीवाला प्रतिष्ठा, योग्य काळजी आणि नवीन आशा देणे हेच आहे."

हेही वाचा – Anant Ambani Watch : अंबानींच्या 'वंतारा'ची जादू आता मनगटावर! 13.7 कोटींच्या घड्याळात साक्षात अवतरलं जंगल; काय आहेत खास वैशिष्ट्ये ?

दरम्यान, ग्लोबल ह्युमॅन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रॉबिन गँझर्ट यांनी अनंत अंबानींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, वंताराने केवळ प्राण्यांचा बचावच केला नाही, तर त्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी जागतिक दर्जाची मानके स्थापित केली आहेत. वंताराने 'ग्लोबल ह्युमॅन सर्टिफाइड' दर्जा मिळवला असून, यासाठी आवश्यक असलेले अत्यंत कठोर ऑडिट यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. यामध्ये वैद्यकीय प्रोटोकॉल, पोषण, सुरक्षा आणि कर्मचारी कौशल्य अशा विविध पातळ्यांवर वंताराची तपासणी करण्यात आली.

वंताराचे कार्य आणि प्रभाव

अनंत अंबानींच्या नेतृत्वाखालील वंतारा उपक्रमाने आतापर्यंत अनेक जखमी, पीडित आणि संकटग्रस्त प्राण्यांना जीवदान दिले आहे. हत्ती आणि मोठ्या मांजरींच्या (Big Cats) विशेष काळजीसाठी येथे दीर्घकालीन पुनर्वसन केंद्रे उभारण्यात आली आहेत. वैज्ञानिक संशोधन आणि जागतिक भागीदारीच्या जोरावर लुप्तप्राय प्रजातींचे संरक्षण करण्यात वंतारा आज जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version