देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना राजधानी दिल्लीतून संतापजनक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका खासगी बसमध्ये महिलेसोबत सामूहिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी दिल्लीत एका खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली, यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच घटनेत वापरलेली बसही जप्त केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. नराधमांनी पीडित महिलेला राणी बाग परिसरातून बसमध्ये खेचले, आणि बस नांगलोई परिसराच्या दिशेने वळवली. यावेळी धावत्या बसमध्येच आरोपींनी महिलेवर अत्याचार करायला सुरुवात केली. घडलेल्या प्रसंगातून सावरत पीडितेने क्षणाचा विलंब न करता तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
महिलेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी संबंधीत बस आणि त्या बसच्या ड्रायव्हरसह कंडक्टरला ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान धावत्या बसमधील या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे दिल्लीत पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
#WATCH | Delhi: The police have registered a case of the alleged gangrape of a woman on a private bus in Delhi. The police have arrested both accused individuals and also seized the bus used in the incident. (Visuals of the bus seized by the police) pic.twitter.com/DFT2toJ5mL — ANI (@ANI) May 14, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.