Beed News : भयंकर! संस्थाचालकाच्या तीन मुली, मुलगा, पत्नी आश्रम शाळेत नोकरीला; घेतातं लाखभर पगार, प्रत्यक्ष मात्र…

Beed News : भयंकर! संस्थाचालकाच्या तीन मुली, मुलगा, पत्नी आश्रम शाळेत नोकरीला; घेतातं लाखभर पगार, प्रत्यक्ष मात्र…

बीड : बीडच्या समाजकल्याणच्या शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या पतीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संबंधित आश्रमशाळेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. संस्थाचालकाच्या कुटुंबातील सदस्य कामावर न येताही लाखो रुपयांचा पगार घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बीडच्या अंतरवन पिंपरी तांडा येथील उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील महिला कर्मचारी सुरेखा चव्हाण यांनी यापूर्वी संस्थाचालक दिनेश लाला पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शाळेतील कामासोबतच घरी धुणी-भांडी, झाडलोट, फरशी पुसणे आणि शेतातील कामे करण्यास भाग पाडल्याचा तसेच नकार दिल्यानंतर सहा महिन्यांपासून वेतन रोखल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर आता कामावर न येताही नातेवाईक लाखोंचा पगार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे आश्रम शाळातील शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

हेही वाचा : Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या, परिसरात भीतीचं वातावरण

अंथरवण पिंपरी आश्रमशाळा – 

1. प्रा. सुशील दिनेश पवार – मुलगा (उच्च माध्यमिक शिक्षक), पगार – 1 लाख 

2. रेखा दिनेश पवार – मुलगी (महिला अधिक्षीका), पगार – 50 हजार 

3. ज्योती दिनेश पवार – मुलगी (प्रयोग शाळा सहाय्यक), पगार – 40 हजार 

4. अनिता रामधन राठोड – पत्नी (मदतनीस प्राथमिक), पगार – 35 हजार 

गेवराई आश्रमशाळा – 

5. प्रियंका दिनेश पवार – मुलगी (माध्यमिक सहशिक्षक), पगार – 70 हजार 

6. प्रीती मधुकर राठोड – सून  (प्रयोग शाळा सहाय्यक), पगार – 40 हजार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version