आव्हाडांची अजितदादांना भावनिक साद

आव्हाडांची अजितदादांना भावनिक साद

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आमच्यासाठी विठ्ठल आहेत. पण आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, आमच्या विठ्ठलाभोवती पण त्यांच्याभोवती बडव्यांचं गराडं आहे. त्यांना दूर करून आम्हाला आशिर्वाद द्या, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी अप्रत्यक्षरित्या जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. ते मुंबईतील एमईटी संस्थेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात केली.

जितेंद्र आव्हाड म्हणले कि, “अजित दादांनी परत यावं, हवं तर मी राजकारण सोडतो. अजितदादांसह सर्वजण परत येण्यासाठी मी राजकारण सोडायला तयार आहे. तुम्ही आमच्यावर टीका करताय तर मी जयंत पाटील यांनासुद्धासोबत घेऊन जाईन. तुम्ही साहेबांना त्रास देऊ नका. पण तुम्ही सर्वांनी परत या. आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, आपण यापासून दूर निघून जाऊ.” ठाणे टोलनाक्यावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजितदादांना परत येण्यासाठी साद घातली आहे.

मी आज शपथ घेणार आहे. तुम्ही परत या, मी आयुष्यात परत कधीही राजकारणात दिसणार नाही. मी दूर निघून जाईल, मला सत्तेचं राजकारण करायचं नाही, मला पैशाचं, साखरेचं, बँकेचं की कुठलचं राजकारण करायचं नाही, महाराष्ट्राचा शाहु, फुले, आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे, साहेबांची ताकद वाढत गेली पाहिजे. अशी माझी भावना आहे.”माझ्यासारखा माणूस पक्षातून बाहेर ढकलल्यावर पक्ष वाढणार असेल तर मी साक्ष देऊन सांगतो मी तर जाईलच पण जयंत पाटील यांनाही घेऊन जाईल. पण आम्ही बडव्यांनी साहेबांना घेरलंय असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही सोडून जातो, पण तुम्ही परत या, साहेबांना त्रास देऊ नका.” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version