‘हे सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे; अजित पवारांचा प्रहार

‘हे सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे; अजित पवारांचा प्रहार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेल्या मेस्माच्या मुद्द्यावरून शिवसेनेसह विरोधी पक्षही सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. सरकार लोकशाहीचा गळा घोटत असून त्यांची हुकुमशाही प्रवृत्ती चालू आहे, असं म्हणत अजित पवारांनी सरकारवर टीका केलीय.

दुसरीकडे शिवसेनेनंही आक्रमक होत जर अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावायचा असेल तर त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनही द्यावं अशी मागणी केलीय. तर मेस्मा कायदा मागे घेतल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विख पाटील यांनी दिला आहे.

या अभूतपूर्व गोंधळानंतर अखेर विधानसभा अध्यक्षांनी काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवा कायद्याखाली‘मेस्मा’ लावण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. ज्यावरून मोठं वादंग निर्माण झालंय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version