‘देवसेना’ बनणार ‘अम्मा’?

‘देवसेना’ बनणार ‘अम्मा’?

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई   

बाहुबली चित्रपटामधून केवळ दाक्षिणात्यच नव्हे, तर देशभरातल्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली नायिका म्हणजे अनुष्का शेट्टी. आता अनुष्का शेट्टी लोकांच्या पुन्हा भेटीला येणार आहे, ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जययललिता यांच्या रूपात. 

जयललिता यांच्या जीवनावर आधारीत ‘अम्मा’ या चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी अनुष्का शेट्टीला विचारण्यात आलं आहे. अनुष्का शिवाय ऐश्वर्या राय-बच्चनचंही नाव या भूमिकेसाठी आघाडीवर आहे.

Poll

{loadmodule mod_sp_poll,Poll: लक्षवेधी //fa-check}

 

जयललिता यांचे सहकलाकार आणि राजकीय गुरू अभिनेते एमजीआर यांच्या भूमिकेसाठी कमल हसन किंवा मोहनलाल या दिग्गज अभिनेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

 

बॉलिवूडमध्ये ‘संजू’ या संजय दत्तच्या जीवनावर आधारीत बायो-पिकने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. सनी लिओनीच्या आयुष्यावरही बायो-पिक प्रेक्षकांना वेब सीरिजच्या रूपात पाहायला मिळालाय. सावित्री या जुन्या जमान्यातील तामिळ अभिनेत्रीच्या जीवनावर आधारीत ‘महानटी’ या तामिळ सिनेमानेही रसिकांची वाहवा मिळवली आहे. तेलुगू सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि तेलुगू देसम पक्षाचे संस्थापक एनटीआर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचं शूटिंगही सध्या सुरु आहे. त्यामध्ये आता जयललिता यांच्याजीवनावर आधारीत सिनेमाची भर पडणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते पी. भारतीराजा आणि निर्माते आदित्य भारव्दाज हे दोघे मिळून ‘अम्मा’ चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे संगीत इलय्याराजा देणार आहेत. डिसेंबरपर्यंत या सिनेमाची शूटिंगही सुरु होणार आहे.

 

जयललिता याचं निधन 5 डिसेंबर 2016 मध्ये चेन्नईत झाले. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक वर्षं तामिळनाडूमधील राजकारण जयललिता यांच्याभोवती फिरत होते. त्यामुळे जयललिता यांच्यावरील चित्रपटाला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभेल, यात शंका नाही. मात्र ‘अम्मा’ची भूमिका नेमकी कुणाच्या झोळीत पडते, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version