जिया खान आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीवर आरोप निश्चित

जिया खान आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीवर आरोप निश्चित

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी अभिनेता सुरज पांचोली विरधात आरोप निश्चित केले आहेत. विशेष न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी आरोप निश्चित केले.

त्याचप्रमाणे खटल्याची सुनावणी 14 फेब्रुवारी पासून घेण्यात येईल अशी माहिती दिली आहे. 3 जून 2013 मध्ये जियाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली.

परंतु ही आत्महत्या नव्हे तर, जियाचा खून करण्यात आला आहे असे जीयाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. तसेच, या प्रकरणात पोलीस तपासात हळगरजीपणा करत असल्याचेदेखील जियाच्या घरच्यांचे म्हणणे आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version