Akola Crime : दुचाकीवरून आला अन् दोन शाळकरी मुलीच्या…, CCTV मध्ये ‘तो’ प्रकार कैद; अकोल्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेले असताना एका मुलीचा छेड काढल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन मुलींपैकी खुलेआम एका मुलीची छेड काढत तरुण पसार झाला.
Akola Crime : दुचाकीवरून आला अन् दोन शाळकरी मुलीच्या…, CCTV मध्ये ‘तो’ प्रकार कैद; अकोल्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेले असताना आता एका मुलीचा छेड काढल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन मुलींपैकी खुलेआम एका मुलीची छेड काढत तरुण पसार झाला. दुचाकीस्वाराने पाठीमागून येत मुलीच्या अंगाला स्पर्श केला आणि तिच्या गळ्यातील आयडीकार्ड अर्थातच ओळखपत्र घेऊन दुचाकीने पळाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. अकोला शहरातील कोचिंग क्लासेस म्हणून प्रसिद्ध असलेला परिसर जवाहर नगर परिसरात ही घटना घडली आहे. शहरासह ग्रामीण भागातून मुली शिकवणी वर्गासाठी या परिसरात येत असतात, अनेकदा या ठिकाणी मुलींचा छेड झाल्यासारख्या घटनाही घडल्या आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दामिनी पथकाची गस्ती वाढवावी, अशी मागणी नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version