रसायनाने भरलेला टँकर उलटला

रसायनाने भरलेला टँकर उलटला

मुंबई गोवा महामार्गावर दासगाव गाव हद्दीत रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला दासगाव जवळ अपघात झाला आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. हा अपघात सकाळी १०वाजताच्या सुमारास झाला आहे. महामार्गावर २ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. टँकर मध्ये ज्वालाग्राही रसायन असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव टँकर वर पाणी मारून मदत कार्य करण्यात आले. हा टँकर मुंबईहून महाड एम आय डी सी कडे निघाला होता. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झाले नाही. क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

हा टँकर मुंबईहुन महाड एम आय डी सी मध्ये जात होता अशी माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. टँकरमध्ये ज्वलनशील रसायने असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव टँकरवर पाणी मारून मदत कार्य करण्यात आले आहे. हा टँकर एम आय डी सी मधील जेट इन्सुलिन कंपनीचा असल्याचा समोर आलं आहे. बॅलन्स गेल्यामुळे टँकर पलटी झाल्याचं समजत आहे. ब्रीदर मधून लिकेज आहे. आणि लिकेज आता थांबलेला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version