अश्विनी महांगडेची खास आठवण

अश्विनी महांगडेची खास आठवण

मुंबई , २७एप्रिल २०२३, प्रतिनिधी :शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच 28 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.सिनेमात अंकुश चौधरी, सना शिंदे यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या समाज माध्यमांवर पद्मश्री शाहीर साबळे यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एक मुलगी देखील दिसत आहे.विशेष म्हणजे तिनं या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून अश्विनी महांगडे आहे.

या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अश्विनी महांगडे हिने एक जुना फोटो सामायिक केला आहे.ज्यामध्ये महाविद्यालयीन जीवनातील अश्विनी आणि शाहीर साबळे यांचा फोटो दिसत आहे. अश्विनी स्वतः वाईची असल्याने तिचे आणि साबळे यांचे एक वेगळेच नाते आहे. अशीच एक गोड आठवण अश्विनीने सामायिक केली आहे.

तिनं कॅप्शन मध्ये म्हटंल आहे की, पद्मश्री शाहीर साबळे (बाबा) यांच्यासोबतचा हा फोटो .. किसनवीर महाविद्यालय, वाई मध्ये शिकत असताना एनएसएस कॅम्प मध्ये काढलेला हा फोटो.’महाराष्ट्र शाहीर’ फिल्म चे शूट संपल्यानंतर असेच पुस्तकं चाळत असताना त्यात कॉलेज वेळचा एक फोटो अल्बम सापडला ज्यात हा फोटो मिळाला..”ही खरंच एक गोड आठवण आहे. हा फोटो पाहून किती आनंद झाला हे शब्दात सांगू शकत नाही. अशा शब्दात अश्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version