तरुणीला वाचवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५ लाखाचं बक्षिस

तरुणीला वाचवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५ लाखाचं बक्षिस

पुण्यात भररस्त्यात तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यानं अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. पुण्यातील सदाशिव पेठेत थरारक घटना घडली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. ही तरुणी या हल्ल्यातून थोडक्यात बचावली, कारण तिच्या मदतीसाठी तीन तरुण धावून आले. हर्षद पाटील, लेशपाल जवळके आणि दिनेश मडावी या तिघांनी जीवाची बाजी लावून पीडितेला वाचवलं.या तिघांच्या धाडसाचे कौतुक होत असतानाच यातील दोन युवकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आषाढी वारी निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे सोलापुर दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तरुण मदत करण्याची घोषणा केली. मोठे धाडस दाखवून तरुणीचा जीव वाचवणाऱ्या दोन युवकांना मंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version