‘केरळचा एक भाग दहशतवाद्यांचा अड्डा बनतोय’

‘केरळचा एक भाग दहशतवाद्यांचा अड्डा बनतोय’

मुंबई, १७ मे २०२३, प्रतिनिधी : मुंबईत बुधवारी ‘द केरळ स्टोरी’ च्या कलाकार आणि वास्तविक जीवनातील काही पीडितांसह पत्रकार परिषदेत घेण्यात आली. पत्रकार परिषदेत आर्ष विद्या समाजम, केरळ मधील २६ महिला देखील उपस्थित होत्या. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दावा केला आहे की, चित्रपटांमधील मधील पात्रांप्रमाणेच त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले आहे. चित्रपटामध्ये दाखवलेल्या ब्रेनवॉशिंगचे खरे बळी आता आर्ष विद्या समाजम आश्रमचा एक भाग आहेत. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या टीमसोबत आश्रमाची एक झलक देखील दाखवली.

‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पत्रकार परिषदेत मोठा दावा केला आहे की,

केरळचा उत्तरी भाग जो दक्षिण कर्नाटकला जोडतो तो दहशतवादी नेटवर्कचा केंद्र आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सेन म्हणाले की, राज्याचा एक भाग अतिशय सुंदर असला तरी दुसरा भाग दहशतवादी नेटवर्कचा केंद्र आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version