महानगरपालिका कर्मचारी मारहाण प्रकरणी महत्वाची बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील असिस्टंट इंजिनियर पाटील यांना काल शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती.
पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परब, हाजी हलीम खान, सदा परब, उदय दळवी, संजय कदम आणि इतर २० शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर आयपीसी कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यांना ११ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी आता मुंबईच्या वाकोला पोलिसांनी शिवसेना गटाचे आमदार आणि विभाग प्रमुख अॅड अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिल परब यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.