सवर्णांच्या पंगतीत बसल्यामुळे मारहाण; तरूणाचा मृत्यू

सवर्णांच्या पंगतीत बसल्यामुळे मारहाण; तरूणाचा मृत्यू

देहरादून येथील तेहरी जिल्ह्यात २३ वर्षीय तरूणाला उच्च वर्णीय लोकांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जितेंद्र दास असे या मृत तरूणाचे नाव असून एका विवाह सोहळ्यात सवर्णांच्या पंगतीत बसल्यामुळे त्याला मारहाण केल्याचे समजते आहे. ही घटाना २६ एप्रिल रोजी नैनबाग तेहसील येथे घडली. मारहाण केल्यामुळे जितेंद्र दास गंभीर जखमी झाला असून त्याला त्वरीत उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नेमकं काय घडलं ?

२३ वर्षीय तरूणाला सवर्णांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना देहरादून येथील तेहरी जिल्ह्यातील नैनबाग तेहसील येथे २६ एप्रिल रोजी घडली आहे.

मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र उपचार सुरू असतानाचा २८ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली.

जितेंद्र दास असे या मृत तरूणाचे नाव आहे.

एका दलित विवाह सोहळ्यात जितेंद्र दासने सवर्णांसाठी नियोजित केलेल्या स्टॉलवरून जेवण घेतले.

त्यानंतर सवर्णांच्या बाजूच्या खुर्चीवर बसल्यामुळे सवर्ण संतप्त झाले.

याच रागाच्या भरात झाल्यामुळे जितेंद्र दासला त्यांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे जितेंद्र दासच्या बहिणीने सांगितले आहे.

तसेच मारहाण केलेल्या सवर्णांविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे जितेंद्र दासच्या कुटुंबावर तक्रार मागे घेण्याची दबाव टाकण्यात येत आहे.

 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version