नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रुग्णांच्या संख्येत 5 पटीने जास्त वाढ झाली आहे.
यावर्षी 592 रुग्णांची नोंद झाली असून 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
गेल्या वर्षी डेंग्यूचे 103 रुग्ण आढळले होते तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
नागपूर विभागात नागपूर ,भंडारा ,गोंदिया ,गडचिरोली ,चंद्रपूर आणि वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये डेंग्यूने थैमान घातलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.