पिस्तुलांची तस्करी करणाऱ्याला अटक; 5 काडकुसे जप्त

पिस्तुलांची तस्करी करणाऱ्याला अटक; 5 काडकुसे जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनन्स स्थानकात एका प्रवाशाला अटक कऱण्यात आलीय. यावेळी पोलिसांनी आरोपीजवळून पाच पिस्तूलं आणि पाच जीवंत काडतूसं हस्तगत केली आहेत. किसन केवट असं या आरोपीचं नाव आहे. एक प्रवासी अवैद्य हत्यारांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच शनिवारी दुपारी गोदाम एक्सप्रेसमध्ये पोलिसांनी सापळा रचून त्यांच्यावर ही कारवाई केली.

दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अशाच प्रकारे एकाला हत्यारांची तस्करी करताना अटक केली होती. त्यामुळे हा शस्त्रसाठा कुठुन येतो आणि कुठे जातो. याचा शोध घेणे महत्वाचे असून पोलीस यापुढे काय कारवाई करतात हे पाहाणं आता महत्वाचं ठरणारे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version