जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र दिनानिमित्त स्थानिक भाषांना प्राधान्य देण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाडीचे अनारक्षित तिकीट किंवा लोकलच्या तिकिटांवर स्थानकांची नावे आता मराठीत छापली जाणार आहेत.
1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. या आधी तिकिटावर हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांत स्थानकांची नावे छापली जात होती. केंद्र सरकारच्या या धोरणानुसार देशभरातील त्या-त्या राज्यातील स्थानिक भाषेला प्राधान्य देण्यात येत आहे. रेल्वे तिकिटांवर स्थानकांची नावे स्थानिक भाषेतही छापण्यात येत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.