वेगळ्या विदर्भासाठी रक्त स्वाक्षरी अभियान; आंदोलन तीव्र करण्याचा श्रीहरी अणेंचा निर्धार

वेगळ्या विदर्भासाठी रक्त स्वाक्षरी अभियान; आंदोलन तीव्र करण्याचा श्रीहरी अणेंचा निर्धार

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं वेगळ्या विदर्भाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. आज महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपुरात जनता कॉलेज चौकात विदर्भ राज्याचं ध्वजारोहन करण्यात

आले.

 

वेगळा विदर्भ झालाच पाहिजे असा नारा देत, रक्ताच्या स्वाक्षऱ्या करण्यात असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवल्या जाणार आहेत. यामध्ये पुरूषांसोबत महिलांचाही मोठ्या प्रमाणात

सहभाग होता.

 

विदर्भ राज्य आघाडी संघटना, विदर्भ कनेक्ट आणि  चांदा प्रसारक मंडळांचा यात समावेश होता. रक्तातून स्वाक्षऱ्या करीत यावेळी रक्तदान ही करण्यात आले.

 

या रक्तदानात विदर्भवाद्यांनी मोठ्या प्रामाणावर रकदान केले.

 

आज महाराष्ट्रदिन साजरा होत असताना, राज्याचे माजी महाधिवक्त श्रीहरी अणेंनी वेगळ्या विदर्भाचं आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला.

 

यासाठी त्यांनी रक्त स्वाक्षरी अभियानाला सुरुवात केली. आंदोलन सुरु होण्याआधी त्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावला. ते प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version