वर्षा गायकवाड दिल्लीला रवाना

वर्षा गायकवाड दिल्लीला रवाना

मुंबई, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र निश्चित झाल्यापासून मुंबई काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. हीच नाराजी जाहीर करण्यासाठी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड दिल्लीला रवाना झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार काँग्रेस महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी १७ जागा लढवणार आहे. यात मुंबईतील फक्त दोन जागांचा समावेश आहे. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोन लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढवणार आहे. एकेकाळी मुंबई महापालिकेवर राज्य करणारी काँग्रेस आता मुंबईतील फक्त दोन जागा लढवणार आहे. काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामुळे मुंबईतील काँग्रेसची ताकद कमी होण्याचा धोका आहे, असे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. हीच भीती व्यक्त करण्यासाठी मुंबईतील अधिकच्या जागा लढवण्याची संधी मिळावी यासाठी काँग्रेसचे मुंबईतील नेते प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वर्षा गायकवाड दिल्लीला रवाना झाल्या आहेत. त्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी मुंबईच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version