मराठीत पाट्या न लावणाऱ्यांवर मोठी कारवाई

मराठीत पाट्या न लावणाऱ्यांवर मोठी कारवाई

मुंबई, प्रतिनिधी, दि. ९ एप्रिल २०२४ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. मात्र अजूनही याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. त्यामुळे मराठी पाट्या लावण्यास टाळाटाळ करणा-यांना १ मेपासून दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार आहे. शिवाय प्रकाशित फलक अर्थात ग्लो साईन बोर्डसाठी दिलेला परवाना देखील तत्काळ रद्द केला जाणार आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अंमलबजावणी बाबत निर्देश दिले आहेत.

अत्रतपर्यंत सुमारे ९६.५० टक्के दुकाने व आस्थापनांनी मराठी देवनागरी लिपित नामफलक लावले असल्याचे आढळले. तर उर्वरित ३,०४० दुकाने व आस्थापना यांनी नियमानुसार फलक लावले नसल्याने त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाने एकूण १३ लाख ९४ हजार रुपयांचा दंड संबंधित दुकाने व आस्थापना व्यावसायिकांना ठोठावला आहे. तर १ हजार ७५१ प्रकरणांची सुनावणी सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version