केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर ३ एप्रिलला सुनावणी

केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर ३ एप्रिलला सुनावणी

नवी दिल्ली, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवार ३ एप्रिल रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. ईडीची बाजू ऐकून घेतल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालय केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर निर्णय घेणार आहे. यामुळे केजरीवाल यांना ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे. केजरीवाल यांच्या ईडी कोठडीची मुदत २८ मार्चपर्यंत आहे. दिल्लीतील राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकारी केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ करायची की नाही याबाबतचा निर्णय घेणार आहेत.

अरविंद केजरीवाल यांना ईडीने दिल्लीच्या दारू घोटाळ्यात अटक केली आहे. सध्या केजरीवाल ईडी कोठडीत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version