नदीत सापडले दोन मुलींचे मृतदेह

नदीत सापडले दोन मुलींचे मृतदेह

रत्नागिरी, १७ मार्च २०२४, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चिपळूण तालुक्यात दसपटी विभागात हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनींचे मृतदेह नदी जवळील भागात सापडल्याने दसपटी विभागात एकच खळबळ उडाली आहे. या मुलींचा घातपात झाला किंवा कसे याबाबत चिपळूण पोलीस तपास करत आहेत. या दोन्ही शाळकरी मुलींचे मृतदेह कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version