मुंबई, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रात मविआचं जागावाटप अडलं आहे. भाजपासमोर काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्यामुळे पंचाईत झाल्याचे वृत्त आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी २० जागांसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. पण मविआकडून राज्यातील एकाही जागेसाठी उमेदवार जाहीर झालेला नाही. काँग्रेसने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या. या दोन्ही याद्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नव्हता. यामुळे मविआचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.