पुणे, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवाजीनगर भागातील आशानगर येथे महानगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. हे उद्घाटन होण्याआधीच उद्धव गट, काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तसेच माजी नगरसेवक दत्ता भैरट यांनी उद्घाटनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, दत्ता भैरट आदी नेते उपस्थित होते. पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. पत्रकाराला धक्काबुक्की झाली. पत्रकाराच्या सोबतच असलेल्या कॅमेरामनच्या हातातून कॅमेरा काढून घेतला तसेच सर्व फाइल्स डिलीट करण्यात आल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.