बिहारची विधानसभा बरखास्त होणार ?

बिहारची विधानसभा बरखास्त होणार ?

पाटणा, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बिहारची विधानसभा बरखास्त होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नितीशकुमार यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतली. यानंतर एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोणाचेही नाव घेतले नाही पण घराणेशाहीवर टीका केली. बिहारमध्ये गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नितीशकुमार यांच्या समर्थकांची बैठक झाली. या बैठकीला जनता दल संयुक्त पक्षातील मोजके नेते उपस्थित होते. राष्ट्रीय जनता दल बिहार सरकारमध्ये सहभागी आहे. पण त्यांच्या एकाही नेत्याला या बैठकीचे आमंत्रण नव्हते. या लागोपाठच्या घडामोडींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांना सादर करण्याची शक्यता वाढली आहे. आधीच ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढेल, असे जाहीर केले आहे. पाठोपाठ आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असे जाहीर केले आहे. यामुळे मोदी विरोधी गटात जागावाटप होण्याआधीच फूट पडली आहे. या परिस्थितीत बिहारमध्ये नितीश यांनी विधानसभा बरखास्त केली तर मोदी विरोधी आघाडी लढण्याआधीच फुटेल असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.

भाजपाची बैठक

बिहार भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बिहारचे भाजपा प्रभारी विनोद तावडे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर बिहार भाजपाचे नेते भाजपाचे राष्

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version