संसद गदारोळ प्रकरणी १४ खासदारांचे निलंबन

संसद गदारोळ प्रकरणी १४ खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली, १४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्यावरून लोकसभेत आणि राज्यसभेत खासदारांनी काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी झालेल्या चर्चेवेळी गदारोळ घातला म्हणून १४ खासदारांचे निलंबन करण्यात आले. यापैकी १३ खासदार लोकसभेचे तर एक खासदार राज्यसभेचा आहे. सर्व १४ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले.

खासदारांना निलंबित केल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज शुक्रवार पर्यंत तहकूब करण्यात आले. याआधी संसदेत झालेल्या घुसखोरी प्रकरणी आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. ही कारवाई लोकसभा सचिवालयाने केली.

लोकसभेतून निलंबित झालेले खासदार : बेनी बेहानन, व्हीके श्रीकंदन, मोहम्मद जावेद, पीआर नटराजन, कनिमोझी करुणानिधी, के सुब्रह्मण्यम, एस वेंकटेशन, मणिकम टागोर

लोकसभेतून निलंबित झालेले काँग्रेसचे खासदार : टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोस

तृणमूल काँग्रेसचे निलंबित झालेले राज्यसभा खासदार : डेरेक ओ ब्रायन

निलंबित सुरक्षा रक्षक : रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र

संसद गदारोळ प्रकरणी १४ खासदारांचे निलंबन
१३ खासदार लोकसभेचे तर एक राज्यसभेचा
संसदेत घुसखोरी; आठ सुरक्षा कर्मचारी निलंबित

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version