‘पारदर्शक पद्धतीने प्रकल्प दिला’

‘पारदर्शक पद्धतीने प्रकल्प दिला’

मुंबई, ६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत उद्धव यांनी मंत्रालय परिसरातील पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी मुंबई म्हणजे अदानी नाही, असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईत धारावी पुनर्विकास योजना राबवली जाणार आहे. यासाठी अदानींना पारदर्शक पद्धतीनेच प्रकल्प दिला आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. हातून सत्ता गेल्याचे दुःख उद्धव यांना सोसवत नाही. याच कारणामुळे ते काहीबाही बोलत असल्याचे राधाकृष्ण विख पाटील म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version