नाशिकमध्ये मनसे आक्रमक

नाशिकमध्ये मनसे आक्रमक

नाशिक, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिकमध्ये दुकानं, आस्थापनं येथील इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. सर्वांनी पाट्या मराठीत कराव्यात. पाट्यांवर इंग्रजी एवढेच अथवा इंग्रजीपेक्षा जास्त मराठीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेने केली आहे. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात मनसेने इंग्रजी पाट्यांविरोधात तीव्र आंदोलन केले. इंग्रजी पाट्यांना मनसेने काळे फासले. मराठी पाट्या लावा नाहीतर तुमच्या तोंडाला काळे फासू असा इशारा मनसेने दुकानदारांना दिला. आंदोलन करत असताना मनसेने जोरदार घोषणाबाजी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version