‘भुजबळांनी संयम बाळगावा’

‘भुजबळांनी संयम बाळगावा’

कोल्हापूर, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा – ओबीसी वाद होऊ नये यासाठी भुजबळांनी संयम बाळगावा, असे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सरकारमध्ये राहून सरकारपेक्षा वेगळी भूमिका घ्यायची नसते. जर आरक्षणप्रश्नी सरकारपेक्षा वेगळी भूमिका मांडायची असेल तर भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असेही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. राज्य शासन ओबीसींचे आरक्षण कायम राखून मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगत आहे. पण राज्य शासनाचे मंत्री छगन भुजबळ मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यास विरोध करत आहेत. मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात वारंवार शाब्दिक चकमक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version