मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना रविवार १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे हा सामना होणार आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्धचा सामना ७० धावांनी जिंकणाऱ्या भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यंदाच्या विश्वचषकात सलग दहा सामने जिंकल्यामुळे भारताकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. क्रिकेटप्रेमींमध्ये अंतिम सामन्याविषयी भरपूर उत्सुकता दिसत आहे. विश्वचषक भारत जिंकू शकतो, असा विश्वास क्रिकेटप्रेमी व्यक्त करताना दिसत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.