कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अमरावती, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन केलं आहे. टोलवर बॅरिकेट लावून या ठिकाणी काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.. समृद्धीवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी दोन रस्ते खुले करण्यात आले आहेत. कंत्राटदारांनी दिवाळीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन दिले नाही. यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचं कामगारांनी सांगितले.. जोपर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version