अखेर कर्नाटक विधानसभा निवणुकीचा दिवस आलाच. कर्नाटक विधानसभा निवणुकीच्या मतमोजणीस सुरवात झाली आहे. एकूण २२४ मतदारसंघाचे निकाल लागणार आहे. या निवणुकीत एकूण २,६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामुळे अखेर मतमोजणीनंतर या उमरदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. मात्र, जेडीएस हा पक्ष किंगमेकरची भूमिका निभावण्याची शक्यता आहे. कर्नाटक भाजपाची सत्ता आहे, परंतु हे सत्ता भाजप राखण्यात यशस्वी रहाणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास भाजप दक्षिण भारतातून नामशेष होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील एकमेवर राज्यात सत्ता टिकवून ठेवणं हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
राज्यात १० मे रोजी मतदार झालं होत. राज्यात मतदानासाठी ५८,५४५ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या निवणुकीत उभ्या असलेल्या २,६१५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ५.३१ कोटी मतदान करनार आहेत. राज्यात ७३.१९ टक्के मतदान झालं. त्यामुळे या निवणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागला आहे. राज्यात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. तसेच नाहुमतासाठी ११३ चा एकदा आवश्यक आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.