मुंबई गोवा महामार्गावर महाड शहराजवळ नाते खिंड याठिकाणी ST बस आणि कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात बसचे फार मोठे नुकसान झाले आहे. तर बसच्या चालक वाहकासह अपघातामध्ये एसटी बस मधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचाराकरीता महाड ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे.
महाड शहराच्याजवळ नाते खिंड येथे हा अपघात झाला.हा अपघात आज मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड नातेखिंडजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्व व्यक्तींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. मुंबई महाबळेश्वर बस आणि डंपर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. एसटी बस मुंबई दिशेकडून महाडकडे येत असताना आणि डंपर महाड दिशेकडून जात असताना दोघांची समोरासमोर भीषण धडक झाली.
या अपघतामध्ये ST बसचे फार मोठ्या प्रमाणत नुकसान झालं आहे. महाड शहर आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतुक सुरळीत सुरु आहे. या अपघातामध्ये एसटी बसमधील २३ प्रवासी जखमी झाले असून डंपर चालक देखील जखमी झाल्याचे समोर आले आहे. सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी महाड शहर पोलीस दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.